कोरोनाला रोखण्यासाठी अब्दुल सत्तार घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

abdul sattar

सिल्लोड- सिल्लोड मतदार संघात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नुसार मालेगावच्या धर्तीवर कोरोनाच्या साथ रोगामध्ये मतदार संघातील नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढीसाठी पहिल्या टप्यात अब्दुल सत्तार यांनी 20 हजार व्यक्तींसाठी जोशींदा काढा ची ऑर्डर दिली आहे.

काही दिवसांपूर्वी सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या मालेगांव येथे मोठ्या प्रमाणात कोरोनाला रोखण्यात यश आले आहेत. यासाठी मालेगाव जि. नाशिक येथील मोहम्मदिया तिब्बीया कॉलेज अँड अँसियर हॉस्पिटलने तयार केलेल्या जोशींदा काढ्याचा नागरिकांनी सेवन केल्याने यामुळे नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढून कोरोना आटोक्यात आल्याचे सांगितल्या जात आहेत.

त्या अनुषंगाने सिल्लोड – सोयगाव मतदार संघातील नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी व कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सदर काढा चा उपयोग होईल व कोरोना सारख्या साथरोग विरोधात लढण्याची शक्ती येईल यासाठी पहिल्या टप्प्यात 20 हजार व्यक्तींसाठी जोशींदा काढाची ना. अब्दुल सत्तार यांनी स्वपदरचा खर्च करून ऑर्डर दिली आहे. लवकरात लवकर सदर काढा उपलब्ध करून देण्याची ग्वाही मालेगाव येथील मोहम्मदिया कॉलेज तर्फे देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

..तर पुढच्या निवडणुका एकत्र लढवू, शरद पवारांचे संकेत

अशोक गेहलोत यांच्या अडचणी सुरुच,निकटवर्तीय उद्योगपतींच्या घरावर आयकर विभागाचे छापे

अक्षय कुमारचा येणारा ‘हा’ चित्रपट आणखी लांबणीवर

‘भाजपा’त प्रवेश करणार नाही; सचिन पायलट यांनी केला मोठा खुलासा