अब्दुल सत्तार यांची माघार ,उमेदवारी अर्ज घेतला मागे

टीम महाराष्ट्र देशा : औरंगाबाद लोकसभेसाठी कॉंग्रेसकडून सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेले कॉंग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडत अपक्ष अर्ज दाखल केला होता. परंतु त्यांचे बंड आता थंड झाले असून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

काँग्रेसने दिलेली उमेदवारी आपल्याला मान्य नसल्याचं सांगत त्यांनी बंड करण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभेच्या निवडणुकीत आपण अपक्ष उभं राहणार असल्याचं सत्तार यांनी म्हटलं होतं. परंतु अर्ज मागे घेतल्याने ते आता कॉंग्रेसमध्ये घरवापसी करणार का विरोधी उमेदाराला मदत करणार हे अजून नक्की नाही. सत्तार यांनी अर्ज मागे घेतल्याने कॉंग्रेसला मोठा फायदा होणार आहे.

उमेदवार बदलण्यासाठी सत्तार यांच्याकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले होते. परंतु त्यांना त्यात यश आले नाही. अखेर त्यांनी ३ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु आता अर्ज मागे घेतल्याने ते पुढे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.