Share

Abdul Sattar । “दोन दिवसात राजीनामा देतो, एकदाचा खेळ…”; आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर अब्दुल सत्तार आक्रमक

Abdul Sattar । नंदूरबारः आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना पुन्हा आव्हान देत दोन वर्षानंतर पाहू, कोण जिंकतो असं म्हटलंय. यावर अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर पलटवार केला आहे. नंदुरबार नगरपालिकेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, पण मी त्यांना आव्हान देतो, दोन दिवसात राजीनामा देतो. एकदाचा खेळ होऊन जाऊ देत. दूध का दूध पानी का पानी होऊ देत. सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार  काय आहे आणि वरळीत आदित्य ठाकरे काय आहेत, हे लोकांना कळू देत, असं आव्हान कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलंय.

“मुख्यमंत्री ज्या ठिकाणी जातात तेथील जनसमुदाय पाहून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद होतो. आम्ही जवळगावला गेलो, शिल्लोड, मालेगावला गेलो. मात्र अत्यंत कमी वेळात एकनाथ शिंदे यांना भरपूर प्रेम मिळाले. याच कारणामुळे काही लोकांच्या पोटात पोटशूळ उठत आहे. नंबर दोनचे पप्पू बोलले. राजीनामा द्या. त्यांना मीच आव्हान देतो, असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, अब्दुल सत्तर यांनी आदित्य ठाकरेंचा छोटा पप्पू असा उल्लेख केल्याने ठाकरे गटाकडून निषेध करण्यात येत आहे. अब्दुल सत्तार हे  बेताल वक्तव्य करत आहेत, असा आरोप करत  जळगावात निषेध करण्यात आला. आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीतर्फे जळगावच्या टावर चौकात बोंबाबोंब आंदोलन करून अब्दुल सत्तार यांचे पोस्टर फाडण्यात आले. त्याच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलीय.

महत्वाच्या बातम्या :

Abdul Sattar । नंदूरबारः आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना पुन्हा आव्हान देत दोन वर्षानंतर पाहू, कोण जिंकतो असं म्हटलंय. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now