अब्दुल सत्तार म्हणतात ‘हे’ च होणार महाशिवआघाडीचे मुख्यमंत्री

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात गेल्या महिन्याभरापासून सत्ता स्थापनेसाठी वेगवान हालचाली सुरु होत्या. मुंबई आणि दिल्लीत महशिव आघाडीचे सरकार स्थापन होण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. आता सोनिया गांधी यांनीही महाशिव आघाडीला हिरवा कंदील दिला असून राज्यात लवकरच महाशिव आघाडीचे सरकार स्थपन होणार असल्याचे दिसत आहे.

राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन होईल. आणि महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेजीचं असतील, असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री पदावरुन भाजप-शिवसेना यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर महायुतीला स्पष्ट बहुमत असताना राज्यातील राजकीय घडामोडींनी वेगळेच वळण घेतले आहे. भाजपला शह देण्यासाठी शिवेसनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्याची तयारी दर्शवली.

दरम्यान, शिवसेनेकडून सुरवातीला आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट केल जात होते. त्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या रांगेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हेही होते. त्यामुळे आता जरी महाशिवआघाडीचे सरकार स्थापन झाले तरी मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :