Abdul Sattar | मुंबई : राज्यात अवकाळी पाऊस (Rain) पडत असल्यामुळे शेतकऱ्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. त्याचबरोबर अचानक पडत असलेल्या पावसामुळे पीकांचंही खूप मोठ्या प्रमाणावर नुसकान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येतं आहे. तसेच शेतकऱ्यांना (Farmer) झालेली नुकसार भरपाईही सरकारने द्यावी, असं बोललं जात आहे. अशातच राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर केला जाणार की नाही?, याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अब्दुल सत्तार(Abdul Sattar)
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही, असे सत्तार म्हणाले आहेत. अब्दुल सत्तार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात ओल्या दुष्काळासारखी स्थिती निर्माण झालेली नाही. मात्र शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे पंचनामे वस्तुनिष्ठ पद्धतीने केले जातील. आता दिवाळीच्या सुट्या लागणार आहे. एक-दोन दिवस शासकीय कर्मचारी सुटीवर असतील. मात्र 15 दिवसांच्या आत सरकारकडे नुकसानीचे आकडे येतील. त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल, असं अब्दुल सत्तारांनी सांगितलं आहे.
तसेच, ओल्या दुष्काळासंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा केली जाणार का?, असा सवाल सत्तारांना करण्यात आला. त्यावर ते म्हणाले,. मंत्रीमंडळ बैठकीत काय बोलावे, काय नाही हे गोपनीय ठेवावे लागते. मंत्रीमंडळाचा तो अधिकार आहे. मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा होईल. त्यानंतर चर्चा तसेच घेतलेले निर्णय सार्वजनिक केले जातील.
राज ठाकरेंनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांना पत्र पाठवत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. अवकाळी पावसामुळेपिकं खराब झाल्याने दिवाळीच्या तोंडावर शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून या शेकऱ्यांना दिलासा द्यावा, असं राज यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Rajan Salvi | नितेश राणेंच्या दाव्याला राजन साळवींचे त्याच शब्दात प्रत्युत्तर! म्हणाले, “ये अंदर की बात है…”
- Sambhaji Raje | मी एकमेव माणूस आहे महाराष्ट्रात जो घरी बसत नाही – छत्रपती संभाजीराजे
- Ashish Shelar । “जे घरकोंबडे आहेत, ते जनतेत राहतील कसे?”; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला
- Bhaskar Jadhav | राणे कुटुंबातील व्यक्तिंवर अक्षेपार्ह वक्तव्य केल्याने भास्कर जाधव यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल
- Raj Thackeray | “राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा”; राज ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी