जालना – भाजपचेच 25 आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. ते जालन्यात एका उदघाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते. काल रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीतील 25 नाराज आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते, परंतु भाजपचेच आमदार नाराज असून त्यांचे 25 आमदार फुटू नये म्हणून दानवे खोटं बोलत आहेत, असे सत्तार यावेळी म्हणाले.
खरंतर भाजपचेच 25 नाराज आमदार महाविकास आघाडीत प्रवेश करणार असल्याचे सत्तार यावेळी म्हणाले. दानवे यांचा हा दावा म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे असा असल्याचं सांगत सत्तार यांनी दानवे यांची खिल्ली उडवली. आज जालन्यात पंचायत समिती कार्यालयाचे सत्तार यांच्या हस्ते लोकार्पण झाले त्यांनतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एमआयएमला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय महाविकास आघाडी सरकार मधील प्रमुख नेते घेतील अशी माहितीही सत्तार यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या: