Share

Abdul Sattar | ‘दारू पिता का?’ प्रश्नावर अब्दुल सत्तारांनी दिलं स्पष्टीकरण म्हणाले…

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी बीड (Beed) जिल्ह्याचा दौरा केला. त्यावेळी जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांना अब्दुल सत्तारांनी “दारू पिता का?”, असा प्रश्न विचारला. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. यावरून अब्दुल सत्तारांवर विरोधी पक्षनेत्यांनी टीका करायला सुरूवात केली आहे. अशातच या सगळ्याबाबत अब्दुल सत्तारांनी स्पष्टिकरण दिलं आहे.

काय म्हणाले अब्दुल सत्तार (Abdul Sattar)

व्हायरल होणारा व्हिडीओ 15 दिवसांपूर्वीच्या बीडच्या दौऱ्यामधला आहे. त्यावेळी चहा पिण्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं होतं. पण आता लोकांना काही कामच राहिलेलं नाही. तेवढंच काम राहिलं आहे, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. सत्तार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना त्यांनी असंही म्हटलं की, बीडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आहेत. त्यांच्याशी चहाच्या गप्पा मी मारत होतो. तुम्ही जर आले, आणी मी तुम्हाला म्हटलं चहा घ्या. तुम्ही चहा घेत नाही, तर मग काय दुसरं काही घेता का? असं विचारलं. हेही बोलणं पाप असेल, तर मग त्याला नाईलाज आहे.

दरम्यान, दौऱ्यावर असताना अब्दुल सत्तार, अर्जून खोतकर (Arjun Khotkar) आणि काही अधिकारी चहा पिण्यासाठी बसले होते. तेव्हा जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा (Radhavinod Sharma) यांनी ‘चहा कमी पितो,’ असं म्हटलं. त्यावर अब्दुल सत्तारांनी “दारू पिता का?”, असा प्रश्न विचारला. त्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हशा पिकला.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी बीड (Beed) जिल्ह्याचा दौरा केला. त्यावेळी जिल्हाधिकारी राधा …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now