Share

Abdul Sattar | ठाकरे गटाला ‘मशाल’ चिन्ह मिळाल्यानंतर अब्दुल सत्तार यांचे महत्त्वाचे विधान, म्हणाले…

मुंबई : काल रात्री  निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव दिलं असून, ‘मशाल’ चिन्ह दिलं आहे. तर एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नावं दिलं असून, आयोगाकडून शिंदे गटाला अद्याप कोणतच चिन्ह मिळालं नाहीय. आयोगाने दिलेल्या या निर्णयावर अनेकांनी आप-आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आयोगाच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अब्दुल सत्तार ?

आमच्या पक्षाला बाळासाहेबांच्या नावाने मान्यता मिळाली आहे. एकनाथ शिंदे हेच असे चिन्ह आहेत की सामान्य माणूस त्यांना हे आमचे मुख्यमंत्री आहेत असे आदराने म्हणतो, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.आमच्या हक्काचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवले गेले. त्यामुळे कोणते चिन्ह द्यायचे हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. निवडणूक आयोग जे चिन्ह देईल ते आम्हाला मान्य असेल, असं देखील सत्तार म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत लाखो कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आगामी काळात आम्हालाच धनुष्यबाण हे चिन्ह मिळेल, अशी आशा अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली आहे. पुढे बोलताना सत्तार म्हणाले की, आमच्या बॅनरवर आता बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आहे. त्यांनी (उद्धव ठाकरे) स्वत:च्या नावावर पक्ष काढला आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर किती पक्ष चालतो हे आगामी महापालिका, जिल्हापरिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समजेल.

दरम्यान, एकनाथ शिंदे गटाकडून आयोगाला तीन चिन्ह देण्यात आली होती. परंतू तिनही चिन्ह आयोगाने मान्य न केल्यामुळे शिंदे गटाला आज सकाळी 10 वाजेपर्यंत नवीन चिन्ह सादर करायची होती. त्यामुळे आता निवडणूक आयोग शिंदे गटाला कोणते चिन्ह देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या :

मुंबई : काल रात्री  निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव दिलं असून, ‘मशाल’ चिन्ह दिलं …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now