‘ज्या लोकांच्या भावना नालायक असतात ते नालायक सारखेच बोलतात’; अब्दुल सत्तार यांचा दरेकरांवर पलटवार 

abdul sattar

 बुलढाणा – राज्यात होत असलेले महिलांवरील अत्याचार याला सर्वस्वी जबाबदार हे नालायक महाविकास आघाडी सरकार असल्याचं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी पुणे येथे केले आहे. त्यावर आता  राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जोरदार पलटवार केला आहे.

बुलढाण्यात बोलताना सत्तार म्हणाले की ज्या लोकांच्या भावना नालायक असतात ते नालायक सारखेच बोलतात, त्यांना चांगलं बोलणं येतच नाही, आणि प्रवीण दरेकर यांच्या बोलण्यामध्ये कितपत तथ्य असतं हे देखील सर्वांना माहीत आहे.मात्र महिलांवरील अत्याचाराच्या घडत असलेल्या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत, त्या घटना महाराष्ट्रात घडायला नको, अशा भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.नुकत्याच घडलेल्या निर्भया अत्याचाराच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी त्या कुटुंबाची जबाबदारी उचलून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी DG ला दिले आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, सत्तार मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार बुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पाहणी करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून सर्व प्रकारचा सर्वे करून अहवाल पाठविण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत, यावेळी त्यांच्यासोबत खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, आमदार संजय रायमुलकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष जालींदर बुधवत, यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या