Share

Abdul Sattar | “युती तोडून महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांनी…”, अब्दुल सत्तारांचा संजय राऊतांवर पलटवार

Abdul Sattar | मुंबई :  खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना उद्देशून वक्तव्य केलं होतं. यावेळी, तुमच्या कपाळावर जो गद्दारीचा शिक्का बसलेला आहे तो कधीही पुसला जाणार नाही, असं राऊत म्हणाले होते. यावर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

२०१९ मध्ये यांनी युती तोडून आणि महाविकास आघाडीसोबत जाऊन जो आमच्या कपाळावर शिक्का बसवलाय तोच अजुन मिटला नसल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले.

तसेच, त्यांच्या माथ्यावर जे लिहिलेलं आहे तेच आमच्या माथ्यावर, २०१९ मध्ये महाविकास आघाडी करताना, ज्या युतीमध्ये आम्ही निवडून आलो आणि त्यांना धोका देऊन जे सरकार स्थापन केलं. त्याचा त्यांना कदाचित पश्चाताप होत असेल तर तेच पाहावं, मध्ये काहीदिवस ते तुरुंगात राहिले होते तेव्हा त्यांना झाला असं मला वाटतं असल्याचं देखील सत्तार म्हणाले.

भाजपा आणि मुख्यमंत्री हे एकमेकांना विश्वासात घेऊन निर्णय घेतात. त्यामुळे कोणीही बॅकफूटवर नाही, कोणीही नाराज नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघेहीजण समन्वयाने सरकार चालवत आहेत. या परिणाम आगामी जिल्हापरिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुकांमध्ये तुम्हाला दिसेल, असं देखील अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

दरम्यान, या निवडणुकांमध्ये आमची पहिली परीक्षा होईल. मला वाटतं की देवेंद्र फडणवीसांचा अनुभव व केंद्र सरकारचा मोठा पाठिंबा आम्हाला निधीच्या माध्यमातून आम्हाला मिळतोय. भाजपाचे मी मनापासून आभार मानेल, की त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांची निवड केली. चालत्या, फिरत्या कार्यकर्त्यालाही मुख्यमंत्रीपद मिळून शकतं, असा निर्णय मी तरी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Abdul Sattar | मुंबई :  खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना उद्देशून वक्तव्य केलं होतं. यावेळी, तुमच्या कपाळावर जो …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now