जालना : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील बंडखोरीनंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगाचा आज सहावा दिवस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते सरकारला वाचवण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहेत. दोन्ही बाजूंमधील भांडण अजूनही सुरूच आहेत. अशातच शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे दोघंही माझ्या संपर्कात आहेत, असा दावा केला आहे.
राज्याबाहेर गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांशी परत येण्यासाठी शिवसेनेकडून संपर्क सुरू आहे, अशी माहिती शिवसेनेचे माजी राज्यमंत्री आणि जालना जिल्ह्यातील नेते अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. येत्या 28 तारखेला जालन्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी जिल्हा शिवसेनेची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर ते बोलत होते. अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे माझ्या संपर्कात असल्याचे खोतकर यांनी म्हटलं आहे. राज्याबाहेर गेलेले आमदार पुन्हा परत येतील असा विश्वास देखील खोतकर यांनी व्यक्त केला.
मुंबई, नागपूरसह अनेक शहरांत शिंदे यांच्या विरोधात निदर्शने
महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक रविवारी रस्त्यावर उतरून एकनाथ शिंदे यांचा निषेध करत आहेत. मुंबईतील सामना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांची गर्दी आहे. नागपूर आणि नाशिकमध्ये बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. भगवे झेंडे घेऊन रॅली काढण्यात आल्या असून शिंदे गटाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<