‘पहिले स्वबळावर आमदार निवडून आणा मग मुख्यमंत्रीपदाचं बोला’, सत्तारांचा पटोलेंना टोला

nana patole - abdul sattar

जालना : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आगामी काळातील सर्व निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढणार असे छातीठोकपणे सांगत आहेत. आता नाना पटोले यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर लक्ष असल्याचं समोर आलंय. आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री बनायचे असल्याची इच्छा नाना पटोले यांनी बोलून दाखवली आहे.

यावर आता शिवसेनेने पटोलेंना जोरदार उत्तर दिले आहे. शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनीही नाना पटोलेंच्या विधानाला प्रत्युत्तर देत पुढील साडेतीन वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल असं सांगितले. तसेच भविष्यातही शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असा दावाही मंत्री सत्तार यांनी केला. मंत्री अब्दुल सत्तार हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना हे विधान केले आहे.

नाना पटोले यांनी पहिले स्वबळावर त्यांचे आमदार निवडून आणावेत मग बोलावे असा टोलाही सत्तार यांनी पटोलेंना लगावला. नाना पटोलेंनी पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे भविष्यात महाविकास आघाडीची वाटचाल कशी असेल हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाना पटोले यांच्या विधानानंतर आता जालना नगरपालिकेच्या निवडणुकतही शिवसेनेने स्वबळाची भाषा सुरू केली आहे. आम्ही नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस जर स्ववळावर लढले तर आम्हीही स्वबळावर लढण्यास तयार आहोत, अशी माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या 

IMP