सराव सामन्यातच एबीडीने झळकावले शतक ; प्रतिस्पर्धी टीमना दिला धोक्याचा इशारा

abd

नवी दिल्ली : १९ सप्टेंबरपासून दुबई येथे आयपीएलच्या मे महिन्यात स्थगित झालेल्या दुसऱ्या हंगामाला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर संघ दुबई येथे मागच्या आठवड्यात दाखल झालेले आहे. क्वारंटाईनचे नियम पाळत संघानी सरावाला सुरुवात केली आहे. दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या स्टार फलंदाज एबी डिव्हिलर्सने सराव सामन्यात शतक झळकावले आहे.

मिस्टर ३६० डिग्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एबीने शतक झळकत विरोधी संघाना जणू आपण फॉर्म मध्ये असल्याचा इशारा दिला आहे. आरसीबीने त्यांच्या ट्वीटरवर एक सरावाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी या संबंधी माहीत दिली आहे. बोल्ड डायरीज नावाने असलेल्या कॅप्शन मध्ये त्यांनी एबीने सर्व सामन्यात शतक केल्याची माहिती दिली आहे. याच बरोबर बंगलोर संघात नवीन खेळाडू असलेल्या के एस भरतने ९५ धावांची खेळी केली आहे. हर्षल पटेल इलेव्हन विरुद्ध देवदत्त पड्डीकल इलेव्हनमध्ये झालेल्या सामन्यात सगळ्याच फलंदाजांनी आनंद घेतल्याचे देखील म्हंटले आहे.

सराव सामन्यातच आरसीबीच्या फलंदाजांना सूर गवसत आहे. ज्यामुळे विरोधी संघांसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. एबी डिव्हिलर्स आरसीबीच्या मुख्य फलंदाजनपैकी एक आहे. त्यामुळे त्याचा फॉर्म संघाला कोणत्याही स्तिथीतून विजय मिळवून देऊ शकतो. एबीचे फॉर्ममध्ये असणे आरसीबीसाठी आनंदाची बाब ठरणार आहे. दुसऱ्या हंगामात आरसीबीचा पहिला सामना २० सप्टेंबर रोजी कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या