अबब! आयपीएल स्थगित झाल्याने BCCIला तब्बल २२०० कोटींचा फटका

IPL

नवी दिल्ली : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. मात्र स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने आयपीएलला गाठले. स्पर्धेत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धा ही अनिश्चीत काळासाठी रद्द करण्यात आली आहे. बीसीसीआयने एक पत्रक जाहीर करुन ही माहिती दिली आहे.

यंदाची आयपीएल मध्यावरच स्थगित करावी लागल्यामुळे बीसीसीआयला दोन हजार कोटींपेक्षा अधिक रक्कमेचा फटका बसण्याची शक्यता आहे. ३० मेपर्यंत पूर्ण होणारी आयपीएल मध्यावर स्थगित करावी लागली. ५२ दिवसांच्या स्पर्धेत एकूण ६० सामने होणार होते. त्यापैकी २४ दिवसांचा खेळ झाला आणि २९ सामने शक्य झाले. साधारणतः दोन ते अडीच हजार कोटींच्या घरात म्हणजेच २२०० कोटींचे नुकसान आम्हाला होऊ शकते, असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले आहे.

दरम्यान, भारतात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे संकेत मार्चच्या अखेरीस मिळण्यास सुरुवात झाली होती. त्याच सुमारास ब्रिजेश पटेल अध्यक्ष असलेल्या समितीने कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढल्यास आयपीएल संयोजनात अडचणी येतील, त्यामुळे स्पर्धा अमिरातीत घेण्याची सूचना केली होती.

महत्त्वाच्या बातम्या