Breaking : भारताच्या कुटनीतीचा विजय, अभिनंदन वर्धमान यांना उद्या पाकिस्तान सोडणार

टीम महाराष्ट्र देशा : पाकिस्तानच्या ताब्यात असणारे भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची उद्या सुटका करण्यात येईल, अशी माहिती पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. इम्रान यांनी पाकिस्तान संसदेत या बद्दलची माहिती दिली आहे. पाकिस्तानकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे भारताच्या कुटनीतीचा विजय झाल्याच मानलं जात आहे.

पाकिस्तानने भारतीय पायलटला पकडले असून दोन्ही देशात पुन्हा शांतता आणि चर्चा सुरु व्हावी यासाठी अभिनंदन यांना सोडण्यात येणार असल्याचं इम्रान खान यांनी सांगितले आहे. कालपासून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे कळताच देशाच्या सामाजिक स्तरातून अभिनंदनला भारतात आणा अशी मागणी होत आहे.तर ट्विटरवर #BringBackAbhinandan ट्रेंड होत आहे. तर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील अभिनंदन वर्धमानला भारतात आणण्यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकणं सुरु केलं आहे.

दरम्यान, उद्या पाकिस्तानी लष्करी अधिकारी उद्या संध्याकाळपर्यंत सीमेवर अभिनंदन यांना सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.Loading…
Loading...