Karnataka Election : आता भारतात ‘काँग्रेस खोजो’ अभियान चालेल

टीम महाराष्ट्र देशा : भाजपाचा हा ऐतिहासिक विजय आहे. कर्नाटकातील जनतेचे आभार.. आता देशात काँग्रेस खोजो अभियान चालेल, काँग्रेस कुठं असेल सांगता येणार नाही असा उपोरोधील टोला छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग यांनी काँग्रेसला लगावला आहे.

bagdure

सध्या भाजपा १२० जागांवर आघाडीवर आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा पार केलेल्या भाजपाकडून देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा जनता दल सेक्युलर (जेडीएस) किंगमेकर ठरण्याची शक्यता सर्वच मतदानोत्तर चाचणीत दिसून आली होती. परंतु, देवेगौडा यांचे हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. कारण बहुमताकडे वाटचाल करत असलेल्या भाजपाने आम्हाला जेडीएसची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे.

You might also like
Comments
Loading...