एबी डिव्हिलियर्स तिसऱ्या मुलाचे नाव ‘ताज’ ठेवणार

वेब टीम- दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सला भारतामध्ये आजपर्यंत बरच प्रेम मिळालं आहे. आयपीएलमध्ये मागच्या १० वर्षांपासून एबी डिव्हिलियर्स बंगळुरूकडून खेळत आहे. धोनी आणि कोहलीप्रमाणेच एबीचेही भारतात मोठ्या प्रमाणावर फॅन्स आहेत.

ए.बी. डिव्हिलियर्स त्याच्या तिसऱ्या मुलाचे नाव ताज ठेवणार आहे. ए.बी. डिव्हिलियर्सला भारतात राहायला आणि इथली संस्कृती जोपासायला आवडते. 2012 सालच्या आयपीएलमध्ये एबी डिव्हिलियर्सने त्याच्या बायकोला ताजमहालामध्ये प्रपोज केले होते. त्यामुळे ताजमहालाचे ए.बी. डिव्हिलियर्सच्या आयुष्यात महत्त्व आहे. ए.बी. डिव्हिलियर्सची तेव्हाची गर्लफ्रेंड आणि आताची बायको डॅनिलेला प्रपोज करण्यासाठी दिल्लीवरून आग्य्राला गेला होता.

ताजमहालात पोहोचल्यावर ए.बी. डिव्हिलियर्सने तिला लग्नाची मागणी घातली. 2015 साली ए.बी. डिव्हिलियर्स आणि डॅनिलेला पहिला मुलगा झाला. त्याचे नाव ‘एबी’ ज्युनियर ठेवण्यात आले. 2017 साली झालेल्या दुसऱ्या मुलाचे नाव त्यांनी जॉन रिचर्ड ठेवले. आता तिसऱ्या बाळाचे नाव ताज ठेवणार आहे.

जॉन्टी रोह्डसनंही दिलं भारतीय नाव

दक्षिण आफ्रिकेचा दुसरा क्रिकेटपटू जॉन्टी रोह्डसनंही त्याचा मुलीचं नाव इंडिया ठेवलं. आयपीएलच्या आठव्या मोसमावेळी जॉन्टीला मुंबईमध्ये दुसरी मुलगी झाली. त्यामुळे त्यानं मुलीचं नाव मुंबई ठेवलं.

You might also like
Comments
Loading...