ठाकरे चित्रपटातील ‘आया रे सबका बापरे…’ गाणे लाँच

टीम महाराष्ट्र देशा : येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘ठाकरे’ चित्रपटातील ‘आया रे सबका बापरे, कहते है उसको ठाकरे’ हे हिंदी गाणे आज लाँच करण्यात आले. वांद्रे येथील ताज लँण्ड एण्ड्समध्ये हा सोहळा पार पडला.या लाँचिंग कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, नवाजुद्दीन सिद्दिकी यांसह अनेक कलाकार आणि राजकीय मंडळी उपस्थित राहणार आहेत.

हा चित्रपट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असून यामध्ये बाळासाहेबांची मुख्य भूमिका नवाजुद्दीन सिद्दिक़ी निभावत आहेत.चित्रपट अभिजित पानसे दिग्दर्शित असून या चित्रपटाचे निर्माते खा. संजय राउत हे आहेत.बाळासाहेबांची जयंती २३ जानेवारी आहे तर हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

You might also like
Comments
Loading...