सलमान मुस्लीम असल्यानेच शिक्षा झाली, पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांचे विषारी फुत्कार

asif khawaja

टीम महाराष्ट्र देशा– सलमानच्या प्रकरणावर दिलेल्या कोर्टाच्या निर्णयाला पाकिस्तानने धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. सलमान खान मुस्लीम असल्यामुळेच त्याला शिक्षा सुनावण्यात आली या शब्दात पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा असिफ यांनी आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन जगासमोर केलं आहे.

नेमकं काय म्हणाले ख्वाजा असिफ
”सलमानला शिक्षा देण्यात आली कारण, तो मुस्लीम आहे. प्रकरण पाहिलं, तर वीस वर्षे जुनं आहे, मात्र त्यात सलमानला शिक्षा सुनावण्यात आली. हा निर्णय हेच दाखवतो, की भारतामध्ये मुस्लीम, अस्पृश्य आणि ख्रिश्चनांची काही किंमत केली जात नाही.सलमान खान भारतातील सत्ताधारी पक्षाशी संबंधित असता तर त्याला एवढी शिक्षा देण्यात आली नसती, कोर्टही त्याच्याबाबतीत सौम्य झालं असतं”.

दरम्यान,काळवीट शिकारप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावलेला अभिनेता सलमान खानच्या जामीन अर्जावर आज जोधपूर सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती. सलमान खानला आज जामीन मिळतो, की तुरुंगातला त्याचा मुक्काम वाढतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. मात्र, सलमानला आजही तुरुंगात रहावं लागणार, जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. सलमान खानचा जामीन अर्जावरचा निर्णय़ उद्यापर्यंत राखून ठेवला आहे.

काय आहे प्रकरण ?

कांकाणी गावात दोन काळवीट शिकार केल्याचं हे प्रकरण आहे. सलमानने १९९८ मध्ये एक आणि दोन ऑक्टोबरच्या रात्री विविध ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे.गोळीचा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी आले. तेव्हा सलमानने इतर कलाकारांसोबत गाडीतून पळ काढला, तर दोन्ही हरणांचे मृतदेह तिथेच पडून होते. याप्रकरणी सलमान दोषी ठरला आहे.दरम्यान, कोर्टानं शिक्षा सुनावण्याआधी जेव्हा सलमान आणि इतर आरोपींना आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली, तेव्हा सर्वांनीच आपल्यावरचे आरोप नाकारले होते.आपण काळविटाची शिकार केली नाही, त्यात आपला कुठलाही हात नाही, असं म्हटलं होतं.मात्र कोर्टानं त्यानंतर सलमान खानला दोषी ठरवत असल्याचं जाहीर केलं. तर इतर आरोपींना केवळ पुराव्याअभावी निर्दोष सोडलं.

1 Comment

Click here to post a comment