शेतकऱ्यांची काळजी या सरकारला नसेल तर गाठ आमच्याशी आहे; शेलारांचा सरकारला थेट इशारा

aashish shelar

पुणे : देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महावितरणनं चांगल काम केले आहे. वाढलेली थकबाकी ही शेतकऱ्यांना दिलेल्या थकबाकीची मुदत दिल्याने वाढली आहे. शेतकऱ्यांची काळजी या सरकारला नसेल तर गाठ आमच्याशी आहे. असा इशारा भाजपचे प्रवक्ते ,माजी मंत्री आशिष शेलार यांनी राज्य सरकारला दिलाय

पुणे पदवीधर मतदार संघातुन भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ शेलार पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. पब बार उघडण्यापूर्वी मंदिरं उघडण्याची मागणी चुकीची नाही. नियम घालून ते जर उघडलं जाऊ शकतं. तर मंदिरं नियम घालून का नाही मंदिरं उघडली गेली नाही. राज्यातील शाळा उघण्याच्या संदर्भात सरकारने आमच्याशी चर्चा करावी अशी आमची भूमिका आहे. चर्चा केल्यानंतर भाजपची काय भूमिका आहे हे आम्ही जाहीर करू. मात्र करोनाची परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनानं निर्णय घ्यावा हा राज्य सरकारचा निर्णय चांगला आहे. भाजपशी आधी चर्चा करावी आणि मग शाळांच्या संदर्भात आंदोलन करायचं की नाही ते ठरवू. जर आमची सत्ता असती तर आम्ही सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला असता. मात्र हे सरकार असे काही करताना दिसत नाही अस शेलार यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, काल शेलार यांनी पवारांसमोरच कर्तृत्वान मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. “संदर्भ पुन्हा अनचॅलेंज राहू नये म्हणून, जर विषय मुख्यमंत्रिपदाचा असेल, तर पवारसाहेब, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा बाळागणारा समाजात मोठा वर्ग आहे, त्याला माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थन असू शकतं,” असं शेलार यांनी सांगितलं होत.

त्यानंतर आज मात्र आपल्या विधानावरून ‘यु टर्न’ घेतला आहे. ‘देवेंद्र फडणवीस हेच आमचे मुख्यमंत्री म्हणून उमेदवार राहतील,’ ‘ते’ विधान फक्त कार्यक्रमापूरते मर्यादित होते, असे स्पष्टीकरण शेलार यांनी दिले आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेलार यांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे.

महत्वाच्या बातम्या