राज्यपालांना सन्मान देणार आहात की नाही ? ठाकरे सरकारला शेलारांचा थेट सवाल

shelar

पुणे : भारतीय जनता पार्टीची राज्यात पुन्हा सत्ता आल्यास देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असे सांगत भाजपचे आमदार अशिष शेलार यांनी दोन दिवसापूर्वी केलेल्या आपल्या वक्त्याव्या बाबात सारवासारव केली आहे. मुबंईत झालेल्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शेलार यांनी कर्तृत्वान मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. यानंतर त्यांच्यावर टिका करण्यात आल्याने त्यांनी आपल्या वक्तव्या बाबत शनिवारी घुमजाव केला.

पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी शेलार आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राजेश पांडे आदी उपस्थित होते.शेलार म्हणाले, कर्तृत्वान मराठा स्त्रियांवरील पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमात मी त्यावर बोललो. समाजातील सर्व स्त्रिायांना उचित आणि सर्वोच्च स्थान मिळायला हवे. या मताचा मी आहे. पुस्तकापुरताच तो विषय होता. राज्यात भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसच असतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार हे पळपुटे आणि पराधीन असल्याची टिका शेलार यांनी केली. तसेच जनतेच्या प्रश्नावर महाआघाडीच्या ठाकरे सरकारकडून पळ काढण्यात येते किंवा पराधीन आहोत अस उत्तर देण्यात येते. प्रत्येक प्रश्नावेळी  दुसऱ्याकडे बोट दाखविते. इतर राज्यात शेतकर्यासह बलूतेदारांना आपल्या परीने मदत केली. मात्र महाविकास आघाडीचे सरकारकडून कुठलीही मदत करण्यात आली नाही. अकार्यक्षम सरकार असल्याचा ठपका शेलार यांनी ठेवला.

राज्यपाल कोट्यातून सुचविण्यात येणार्या विधानपरीषदेच्या 12 जागांच्या नावात बाबत महाविकास आघाडीने राज्यापालांना 21 नाव्हेंबरचा अल्टीमेटल दिला होता. याबाबत विचारले असता शेलार म्हणाले, राज्यपालांना अल्टिमेटम देण्याची ही मनोवृत्ती कोणती, कायद्यात वेळेबाबत मर्यादा नाही. राज्यपालांना सन्मान देणार आहात की नाही असे ते यावेळी म्हणाले.

पब, बार उघडण्यापूर्वी मंदिरं उघडण्याची मागणी चुकीची नाही. नियम घालून ते जर उघडलं जाऊ शकतं. तर मंदिरं नियम घालून का उघडली गेली नाहीत. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महावितरणनं चांगल काम केले आहे. वाढलेली थकबाकी ही शेतकऱ्यांना दिलेल्या थकबाकीची मुदत दिल्याने वाढली आहे. शेतकऱ्यांची काळजी या सरकारला नसेल तर गाठ आमच्याशी आहे. असा इशारा शेलार यांनी राज्य सरकारला दिलाय.

महत्वाच्या बातम्या