भविष्यात कलानगरवाल्यांना ‘डिपॉझिट’ वाचवण्याचं मशिन घ्यावं लागेल; आशिष शेलारांचा शिवसेनेवर घणाघात

shelar aashish

टीम महाराष्ट्र देशा: ‘जल्लोषात साजरा करण्यासाठी जे ढोल बडवले जात आहेत ते आम्ही मुद्दामच ‘सामना’ ढोल पथकाचे मागवले. गुजरातमध्ये शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं त्यामुळे भविष्यात कलानगरवाल्यांना डिपॉझिट वाचवण्याचं मशिन घ्यावं लागेल. दुसऱ्याच्या घरी पोरगं झालं तरी हे आनंद साजरा करतात. ज्या काँग्रेसला मतं मिळाली की ज्यांना आनंद होतो त्यांचा अंत काँग्रेसच्याच रस्त्यावर होईल.’ अशी टीका मुबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केली आहे.

आशिष शेलार आणि शिवसेनेतील द्वंद्व हे जगजाहीर आहे. सकाळीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपने राहुल गांधींचे कार्य पाहता आपला प्रभाव स्वीकारायला हवा अस वक्तव्य केल होत, त्यावर आशिष शेलार यांनी सेनेला चागालच फटकारलं आहे. आता शिवसेनेकडून यावर काय प्रतिक्रिया येत हे पाहण्यासारख असणारे.