श्री आशापुरी देवी मंदिराचा सौरऊर्जा प्रकल्प प्रेरणादायी – जयकुमार रावल

धुळे : धुळे जिल्हा ऊर्जेचा हब म्हणून विकसित होत असताना श्री. आशापुरी देवी मंदिर प्रतिष्ठानने सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून हरीत ऊर्जा मिळविण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे.

bagdure

पाटण, ता. शिंदखेडा येथील श्री आशापुरी देवी मंदिराच्या विश्वस्तांनी विकसित केलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन मंत्री श्री. रावल यांच्या हस्ते आज सकाळी झाले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मंत्री श्री. रावल म्हणाले, मंदिराच्या विश्वस्तांनी सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करुन मोठे पाऊल उचलले असून हा उपक्रम अनुकरणीय आहे. या उपक्रमामुळे मंदिर विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल. एवढेच नव्हे, तर अतिरिक्त निर्माण होणारी ऊर्जा महावितरणलाही देता येणार आहे. या प्रकल्पातून रोज किती ऊर्जा निर्माण झाली, किती वापरली गेली, महावितरणला किती ऊर्जा उपलब्ध करुन दिली याबाबतची सविस्तर अहवाल रोजच्या रोज उपलब्ध होणार आहे.

You might also like
Comments
Loading...