भाजपला मोठा धक्का,आणखी एक महत्वाचा पक्ष ‘एनडीए’मधून बाहेर पडण्याच्या तयारीत

bjp-flag-representational-image

टीम महाराष्ट्र देशा- केंद्र सरकारने नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक संसदेत संमत केले तर ‘आसाम गण परिषद’ राज्यातील एनडीए सरकारमधून बाहेर पडेल, अशी धमकीच त्या पक्षाचे नेते अतुल बोरा यांनी दिली आहे. आसाम गण परिषदेने दिलेल्या या धमकीमुळे आसामातील भाजपचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांचे सरकार धोक्यात आले आहे.

बोरा हे आसाममधील भाजप-एनडीएच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. ते म्हणाले की, सध्या आम्ही भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी आहोत, पण मोदी सरकारने नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक (2016) संसदेत मंजूर करण्याचा प्रयत्न केला तर आमची ‘आसाम गण परिषद’ त्यांच्या सरकारमधून बाहेर पडेल.