fbpx

आसामसह पूर्वेतल्या राज्यांमध्येही ‘फिर एक बार मोदी सरकार’

टीम महाराष्ट्र देशा : १७ व्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्यातील मतदान आज पार पडले. त्यामुळे आता साऱ्या देशाचे लक्ष २३ मे च्या निकालाकडे आणि देशात कोणाचे सरकार येणार याकडे लागले आहे. तसेच आता एक्झीट पोलनुसार लोकसभा निवडणुकीच्या स्पर्धेत असणाऱ्या पक्षांच्या संभाव्य विजयी उमेदवारांची आकडेवारी बाहेर येऊ लागली आहे.

आसाम मणिपूर, अरुणाचल, त्रिपूरा, सिक्किम, नागालँड, मेघालय, मिझोराम या राज्यांतील एकूण २५ जागांपैकी न्यूज18 लोकमत आणि IPSOS च्या एक्झिट पोलमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना १७ ते १९  जागा मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेसला ४ ते सहा जागा मिळण्याची शक्यता आहे. हा एक्झिट पोल काँग्रेससाठी अत्यंत धक्कादायक मानला जात आहे.