अमृता फडणवीसांवर टीका करणाऱ्या निर्मात्याला आरोह वेलणकरने झापलं

aaroh welankar

मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेच्या दिवशी एक गाणं पोस्ट केलं आहे. तसेच सगळ्या भाऊरायांना एक मागणं केलं आहे.

अमृता फडणवीस यांनी हे गाणं ट्विटर आणि फेसबुकवर पोस्ट करताच त्यांच्या या गाण्यावर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. काही नेटकऱ्यांनी हे गाणं आवडल्याचं म्हटलं आहे. काही नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

दरम्यान, प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता महेश टिळेकर यांनी फडणवीस यांच्या गाण्याची टर उडवली आहे. ‘गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाही’, असं म्हणत त्यांनी अमृत फडणवीस यांना खरंच गाता येतं का? सवाल केला आहे.

गायी म्हशीच्या हंबरडण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण या गायिकेचा आवाज ऐकून तिच्या आवाजाला अनेकांनी शब्दरुपी श्रद्धांजली वाहिली तरीही ही स्वयंघोषित गायिका मी पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन म्हणत आपल्या गळ्याचा व्यायाम थांबवायचे नाव घेत नाही. आपल्याकडे जुनी म्हण आहे .आडात नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून? केवळ ह्या अश्या गायिकेला प्रोमोट करण्यासाठी तिला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्यासाठी टी सिरीज सारखी ,नेहमीच बिझिनेसला प्राधान्य देणारी कंपनी का पैसा खर्च करत आहे,?त्यामागे काय लागेबांधे आहेत ? हे एक न सुटणारे कोडे आणि जर ह्या गायिके कडे स्वतःचा अतिरिक्त खूपच पैसा असेल तर तिने एखादं संगीत विद्यालय सुरू करून नवोदित गायकांना चांगल्या संगीत शिक्षकांचे मार्गदर्शन होईल यासाठी स्वतः न गाता फक्त संगीत सेवा करावी असं महेश टिळेकर यांनी म्हटलं आहे.

पण काहीही म्हणा लता मंगेशकर यांनी गायलेल्या आज अमृताचा दीनु..या ओळीतील अमृता हा शब्द लता दीदींच्या मुखातून ऐकायला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवितून वाचायलाच योग्य वाटतो.इतरांनी फक्त त्या अमृता नावाची किमान लाज राहील याचा तरी प्रयत्न करावा

टिळेकर यांच्या या भाषेवर आरोह वेलणकरनं सोशल मीडियातून टीका केली आहे. ‘तुम्ही केलेली टीका वाचून लाज वाटली. प्रसिद्धीसाठी करत असाल तर हे अधिकच हीन आहे. सुधरा…’ असं आरोहनं म्हटलं आहे. ‘तुमच्या मराठी तारका कार्यक्रमात कोण काम करतंय बघू,’ असा इशाराही त्यानं टिळेकर यांना दिला होता.

आरोह वेलणकरनं नेमकं काय म्हटलं आहे पोस्टमध्ये ?

महेश टिळेकर तुमची टीका वाचून लाज वाटली. मराठी तारका नावाचा कार्यक्रम करता, स्त्री शक्ती, सम्मानाच्या गोष्टी करता, आणि ही कसली भाषा तुमची? नसेल आवडत तर नका एैकू, टीका करायची तर तमा बाळगून करा! कोण समजता तुम्ही स्वत:ला!?

ह्या आधी व्हाया व्हाया माझ्यावरही आणि काही नटांवर तुम्ही अशीच टीका केली होती, तेव्हा दुर्लक्ष केलं. तुम्ही तुमच्या पोस्ट काय विचार करून, ओढून, पीऊन, समजून करता हे कळणं कठीण आहे! फुटेजसाठी करत असाल तर अधिकच हीन आहे तुमचं सगळं! सुधरा…राहीला प्रश्न मराठी तारकांचा, तर ह्या पुढे ह्या तुमच्या स्टंटमुळे तुमच्या कार्यक्रमात कोण काम करतय बघू!

महत्वाच्या बातम्या 

IMP