भाजपला शह देण्यासाठी रघुराम राजन यांना ‘आप’ची उमेदवारी ?

टीम महाराष्ट्र देशा : अरविंद केजरीवाल हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना आम आदमी पक्षातर्फे राज्यसभेची उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. येत्या जानेवारी महिन्यात दिल्लीतील राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी रघुराम राजन यांच्या नावाचा विचार सुरु आहे. याबाबत रघुराम राजन यांना विचारणा सुधा करण्यात आली आहे.

दरम्यान, आप मधील अनेक वरिष्ठ नेते राज्यसभेवर जाण्यास इच्छुक आहेत त्यापैकी कुमार विश्वास याचं नाव आघाडीवर आहे, पण यापैकी कोणाला संधी मिळणार नसल्याचं आपच्या एका मोठ्या नेत्याने स्पष्ट केल आहे.

नरेंद्र मोदी यांच्या अर्थनीतीवर रघुराम राजन खुश नसल्याच बोललं जात होत. तर नोटबंदीला सुद्धा रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी विरोध केला होता. तेव्हा रघुराम राजन यांचा चेहरा वापरण्याची नामी संधी आप साधण्याचा प्रयत्नात आहे.

You might also like
Comments
Loading...