संतापजनक : शिवराज्याभिषेक दिनासंबंधी भाजप नेत्याचे आक्षेपार्ह ट्वीट, आपची पोलिसांत तक्रार

bjp flag

पुणे : ६ जून हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन. छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला होता. या दिवसाला इतिहासात फार महत्त्व आहे. मात्र दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी आपल्या अकलेचे तारे तोडत शिवराज्याभिषेक दिनासंबंधी आक्षेपार्ह ट्वीट केले आहे. . याप्रकरणी आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी संबंधिताविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी गुरुवारी रात्री शिवराज्याभिषेक दिनासंबंधी एक ट्वीट केले. त्यामध्ये शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देत या दिवसाला ‘हिंदू साम्राज्य दिवस’ घोषित करून शुभेच्छा दिल्या.

aadesh gupta tweet

काही महिन्यांपूर्वी भाजप नेते आणि तत्कालीन दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित केले गेले होते. त्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचया इतिहासाची मोडतोड करण्याचा कुटील डाव दिल्लीतून सातत्याने रचला जात असल्याचे शिंदे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे. शिंदे यांनी गुप्ता यांच्याविरुद्ध ऑनलाइन तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर कडक कारवाई व करण्याची मागणी केली आहे.