गौतम गंभीरने ‘जात’ काढल्याने आपच्या उमेदवाराला अश्रू अनावर

aatishi

टीम महाराष्ट्र देशा : क्रिकेटमधून थेट राजकारणात प्रवेश करणारा क्रिकेटर गौतम गंभीर हा नेहमी चर्चेत असतो. भाजपकडून दिल्लीमधून निवडणूक लढविणारा गौतम गंभीर आता वेगळ्याच वादात अडकण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षाच्या पूर्व दिल्ली मतदारसंघातील उमेदवार अतिशी यांनी गौतमवर जातीयवादी प्रचार केल्याचा आरोप केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने अतिशय खालची पातळी गाठल्याची विविध उदाहरणे समोर येत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना राजकीय मंडळी कोणत्याही स्थराला जाऊ शकतात याचा प्रत्यय आता येवू लागला आहे. विकासाचा मुद्दा सोडून कधी सर्जिकल स्ट्राईक,तर कधी धर्म-जात अश्या भावनिक मुद्द्यांवरून एकमेकांवर टीका केली जात आहे.

आम आदमी पक्षाच्या पूर्व दिल्ली मतदारसंघातील उमेदवार अतिशी यांनी भाजपचे उमेदवार गौतम गंभीरचा एक अनपेक्षित आणि घाणेरडा चेहरा जगासमोर आणला. पत्रकार परिषदेत त्यांनी गौतम गंभीर यानी काढलेले एक पत्रक वाचून दाखवले ज्यात त्यांचा उल्लेख ‘मिश्र जाती’चा असा करण्यात आला होता.”ती एक मिश्र जातीची असल्याचे उत्तम उदाहरण आहे” असा आशय असलेली अपमानजनक पत्रके गौतम गंभीर यांच्याकडून वितरीत केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

माझ्यासारखी व्यक्ती राजकारणात यासाठी येत नाही की तिला पैसा पाहिजे. वडील उत्तर प्रदेशातील जाट, आई पंजाबी आणि पती आंध्र प्रदेशातील ख्रिश्चन अशा प्रकारे मी एक मिश्र जातीची असल्याचा घाणेरडा अपप्रचार पत्रकाच्या माध्यमातून केला जात असल्याचे अतिशी यांनी सांगितले. दरम्यान,इतरही अनेक बाबींचा अपमानास्पद उल्लेख त्यांनी केला होत. असा अपमानजनक पद्धतीने प्रचार केला जात असल्याचे सांगत अतिशी यांना पत्रकार परिषदेत अक्षरक्ष: रडू कोसळले.एक खेळाडू म्हणून गंभीर हा भारतीयांच्या गळ्यातील ताईत आहे मात्र राजकारणात उतरल्यावर आता त्याला देखील गलिच्छ राजकारणाच्या विषाणूने डंक केला कि काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.