ग्रामपंचायत निवडणुकीत ‘आप’नेही उघडलं खातं, लातुरातील विजयाने केजरीवालही खुश

AAP also opened an account in the Gram Panchayat elections, Kejriwal is also happy with the victory in Latur

लातूर : आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत खातं उघडलं आहे. विशेष म्हणजे पक्षाचा फारसा प्रभाव नसलेल्या मराठवाड्यात हे यश मिळालं आहे. लातूर जिल्ह्यातील दापक्याळ ग्रामपंचायतीत आपचे जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाचे 7 पैकी 5 उमेदवार विजयी झाले आहेत.

या विजयाबद्दल आपचे महाराष्ट्र युवा अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. अजिंक्य शिंदे यांनी ट्वीटमध्ये विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले असून त्या ट्वीटमध्ये केजरीवालांना टॅग केले आहे. त्यांच्या या ट्वीटची दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दखल घेत सर्व विजयी उमेदवारांचे मराठीतून अभिनंदन केले आहे. केजरीवाल ट्वीटमध्ये म्हणतात की, ”विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!! जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा.”

ग्रामपंचायत निवडणुकीबाबत लातूर जिल्ह्यापुरते बोलायचे झाल्यास येथे भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. तथापि, आम आदमी पक्षाच्या एकमेव विजयाने अवघ्या राज्याचं लक्ष वेधून घेतल आहे.

 

महत्वाच्या बातम्या