मिल कामगारांच्या जमिनी सर्वपक्षीय प्रस्थापित पुढाऱ्यांनी लाटल्या : आप

टीम महाराष्ट्र देशा : १९८८ साली आशियातील सर्वात मोठी जूनी मिल बंद पडल्यावर मिलची जमीन ताब्यात घेण्यासाठी शेकडो कामगारांंनी घामाचे पैसे यूको बैंक व बँक ऑफ बडोदा मध्ये संघर्ष समिती मार्फत गुंतवले. परंतु या संघर्ष समितीच्या कुमार करगजी, शरद मुथा व इतर पदाधिकाऱ्यांनीच प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या मदतीने या जमिनी परस्पर विकल्या. यासाठी खोटी कागदपत्रे तयार केली गेली. अशी तक्रार अनेक वर्षे हे कामगार संबंधित प्रशासकीय अधिकारी करीत होते.

या असहाय्य कामगारांच्या वेदना कोणीच ऐकत नसल्याने आम आदमी पार्टीने २०१६पासून या बाबत कायदेशीर मार्गाने हा प्रश्न सोडवण्यास सुरवात केली आहे. असे आप चे सागर पाटील यांनी सांगितले. या घोटाळ्यातील सहभागाची व्याप्ती नगर भूमापन, निबंधक ,पोलिस ते धर्मादाय आयुक्त कार्यालया पर्यंत आहे. सदरच्या जागेतील अनेक प्लॉट बेकायदेशीर रित्या रोहन सुभाष देशमुख (मा मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव) आणि सुशील कुमार शिंदे यांचे निकटवर्ती विष्णुपंत कोठे यांना संगनमताने विकण्यात आले.

शहरातील बड्या धेडांचा संबंध या तब्बल १३७ एकर जमीन घोटाळ्याशी असल्यानेच कुमार करगजी व संबंधित अजूनही पोलिस कोठड़ी बाहेर आहेत असा आरोप आप ने केला आहे.
यात तब्बल ८०० प्लॉट धारकांंना तातडीने कायदेशीर ताबा दिला जावा. तसेच जुनी मिल बेकार कामगार व जनहित संघर्ष समिती, उमा सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या व्यवहाराची चौकशी व्हावी व संबंधित व्यक्तिवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. मा सुभाष देशमुख यांच्या सहभागाची चौकशी व्हावी, या सर्व मागण्या घेऊन आज दिनांक १६ऑगस्ट रोजी आप चे सागर पाटील व बाधित कामगार जगदीश कुलथे, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसत आहेत. त्यांच्या जीवितास कोणतीही हानी झाल्यास त्याला जिल्हाधिकारी जबाबदार असतील असे आप ने म्हंटले आहे.

आंदोलन शांततेच्या मार्गाने करा, कोणाच्या नावाने शिमगा करू नका : पाटील