Share

Aanand Dave | “पापक्षालन करण्याची गरज ब्राह्मणांना नव्हे तर मोहन भागवत यांना आहे”

पुणे : सध्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण खूपच गढूळ झालं आहे. त्यामध्ये निवडणुकांचंही वारं सगळीकडे घुमू लागलं असल्यामुळे सर्व पक्ष आगामी निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे पक्षनेत्यांमध्ये सतत आरोप-प्रत्यारोपांची खेळी सुरू असते. अशातच राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल ब्राम्हण समाजावर एक वक्तव्य केलं होतं. त्यावेळी मधल्या काळात आपल्या पूर्वजांकडून राष्ट्रीय पाप झालं आहे. एका वर्गावर अन्याय करण्यात आला. त्यामुळे ब्राह्मणांनी पापक्षालन केलं पाहिजे, असं मोहन भागवत यांनी म्हटलं होतं. अशातच त्यांच्या वक्तव्यावरून ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले आनंद दवे ?

पापक्षालन करण्याची गरज ब्राह्मणांना नव्हे तर मोहन भागवत यांना आहे, असं म्हणत आनंद दवे यांनी मोहन भागवत यांच्यावर पलटवार केला आहे. आज आनंद दवे पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. मोहन भागवत यांचं कालचं त्यांचं वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे भागवत यांनी ब्राह्मणांची माफी मागावी, अशी मागणी आनंद दवे यांनी केली आहे.

त्याचबरोबर मोहन भागवत यांनी केलेलं विधान हे त्यांनी अभ्यासाशिवाय केलं आहे, असा आमचा स्पष्ट आरोप असल्याचंही दवे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, ब्राह्मणांनी काही चुका केल्या असतील तर ब्राह्मण समाजातील काही लोकांनी त्याला विरोधही केला आहे. हे भागवतांनी सांगितलं नाही. परंतू असं विधान न करता सरसकट ब्राह्मणांना पापक्षालन करायला सांगितलं जात आहे.

तसेच दवे म्हणाले की, इथला हिंदू नराधमांच्या हाती देण्याचं पाप तुम्ही करत आहात. तुम्हीच पापक्षालन केलं पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रात नाही तर भारतात जातीवाद वाढवत आहात. पापक्षालन करण्याची गरज तुम्हाला आहे. आतापर्यंत हिंदुत्वाचा जागर केला आणि आता मशिदीत मौलवींना भेटायला जात आहात. म्हणून आता पापक्षालन तुम्हीच करायला हवं.

महत्वाच्या बातम्या :

पुणे : सध्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण खूपच गढूळ झालं आहे. त्यामध्ये निवडणुकांचंही वारं सगळीकडे घुमू लागलं असल्यामुळे सर्व पक्ष आगामी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics Pune