fbpx

रामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा: सध्या रिपब्लिकन नेत्यांना फक्त धड असून त्यांचे डोके भलतेच वापरून घेत आहेत. रामदास आठवले हे समाजाला नको असलेले नेते असल्याची टीका रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे. तर कोरेगाव भीमाच्या संघर्षाच्या पार्श्वभुमीवर पुकारण्यात आलेल्या बंदला मिळालेल्या प्रतिसादामुळे सुरू झालेली रिपब्लिकन ऐक्याची चर्चा व्यर्थ असल्याच देखील आंबेडकर म्हणाले.

आनंदराज आंबेडकर यांनी आज (सोमवार) वढू येथील गोविंद गायकवाड यांच्या समाधीसह कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला भेट दिली. त्याचबरोबर पोलीस अधीक्षक सुवेझ हक आणि अतिरिक्त अधिक्षक संदीप पखाले यांची भेट घेऊन तपासाची माहिती घेतली.

या प्रकरणाचा नक्षलवाद्यांशी संबंध जोडून शासन मुळ आरोपींवरील लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करत दंगलीमागे असलेल्या भिडे गुरूजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करून खरे आरोपी गजाआड करावेत अशी मागणी सुद्धा आनंदराज आंबेडकर यांनी केली.