आमिर खानचा मुलगा बॉलिवूडमध्ये काम करण्यास झाला सज्ज…

मुंबई: लॉकडाऊनमुळे अनेक चित्रपटाचे शूटिंग रख डले होते. त्यानंतर नुकतेच यांनी मुंबईमध्ये शुटींगला परवानगी दिल्यानंतर, कोरोना नियमांचं पालन करून या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात करण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान याचा पहिला चित्रपट ‘महाराजा’ चं शुटींगसुद्धा सुरु झालं आहे.

२५ कलाकार आणि मोजकेच क्रु मेम्बरसोबत हे शुटींग केलं जाणार आहे. १०० लोकांची टीम सध्या यामध्ये कार्यरत आहे. या सगळ्या स्टाफची कोरोना चाचणी करून, त्यांना कोरोना लशीचा पहिला डोससुद्धा देण्यात आला आहे. तसेच प्रोडक्शन हाउसमधील अत्यंत महत्वाची लोकचं सेटवर असणार आहेत. मुंबईच्या मरोल भागामध्ये या चित्रपटाचा सेट उभारण्यात आला आहे.

‘महाराजा’ हा चित्रपट १८६२ च्या एका लिबेल केसवर आधारित आहे. आमिर खानचा मुलगा जुनैद यामध्ये एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. करसनदास मुलजी असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव असणार आहे. जुनैदसोबत या चित्रपटात प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री शालिनी पांडेदेखील असणार आहे. शालिनीने यापूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटात काम केल आहे. तसेच शर्वरी वाघ, जयदीप अहलावत यांच्यादेखील मुख्य भूमिका असणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

IMP