fbpx

‘आमीर खान, नवज्योतसिंह सिद्धू आणि नसीरुद्दीन शहा हे गद्दार’

टीम महाराष्ट्र देशा – आमीर खान, नवज्योतसिंह सिद्धू आणि नसीरुद्दीन शहा हे मीर जाफर आणि जयचंद यांच्यासारखेच गद्दार असल्याची टीका आरएसएसचे इंद्रेश कुमार यांनी केली आहे.

काँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू, अभिनेता नसीरुद्दीन शहा आणि अमिर खान यांच्यासारख्यांची देशाला गरज नसून दिवंगत माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या विचारांची देशाला आज गरज आहे, असंही इंद्रेश कुमार यांनी म्हटलं आहे.

यावेळी इंद्रेश कुमार म्हणले की, नवज्योतसिंह, आमीर खान आणि नसीरुद्दीन शहा हे चांगले अभिनेते आहेत, मात्र ते सन्मानास पात्र नाहीत. भारताला कसाब, याकूब आणि इशरत यांसारख्या मुसलमानांची गरज नाही. अब्दुल कलामांनी दाखवलेल्या मार्गाने चालणाऱ्यांची या देशाला गरज आहे

आयोध्ये मधील राम मंदिर बांधणीला लागलेल्या विलंबास काँग्रेस जबाबदार आहे, असा आरोपही इंद्रेश कुमार यांनी केला आहे.