आसाम, गुजरात नंतर आता बिहारमधील पुरग्रस्तांना अमिरची २५ लाखांची मदत

मुंबई : बिहारमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता अमिर खानने मुख्यमंत्री मदत निधीसाठी २५ लाखांची मदत केली आहे. . त्याने आपल्या चाहत्यांनाही पुरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. येथील १ कोटी ६१ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना पुराचा तडाखा बसला आहे. एकट्या अररिया जिल्ह्यात ८६ लोकांचा पुरामुळे मृत्यू झाला असून एकूण ४१५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

अमिरने कुरियरमार्फत मुख्यमंत्री नितीश कुमार यांना २५ लाखांचा धनादेश पाठवला आहे. यापूर्वी आसाम व गुजरातमधील पुरग्रस्तांनाही अमिरने २५ लाखांची मदत केली होती. त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी ट्विटच्या माध्यमातून अमिरचे आभार मानले होते.

You might also like
Comments
Loading...