बिग बी ,शाहरुख आणि सलमानला आमीर खानचे चॅलेंज

Twinkle Khanna and amir khan

टीम महाराष्ट्र देशा- अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने आमीर खान ला एक चॅलेंज केलं होत जे पूर्ण करण्यासाठी आमीर खान ने स्वतःचा सॅनिटरी पॅड हातात घेतलेला फोटो ट्वीट केला आहे.ज्या फोटोची चर्चा सध्या सोशल मिडीयावर जोरदार सुरु आहे .

अक्षय कुमार, सोनम कपूर आणि राधिका आपटे यांची प्रमुख भूमिका असेलला ‘पॅडमॅन’ सिनेमा येत्या ९ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असून पब्लिसिटीसाठी अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने अभिनेता आमीर खान याला एक चॅलेंज दिलं होत जे स्वीकारत आमीर खान ने स्वतःचा सॅनिटरी पॅड हातात घेतलेला फोटो ट्वीट केला आहे. आणि ट्विंकलने दिलेले चॅलेंजपूर्ण केले आहे .

आमीर एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने बिग बी ,शाहरुख आणि सलमानला आता सॅनिटरी पॅड हातात घेऊन फोटो काढून तो पोस्ट करण्याचं चॅलेंज केलं आहे.आता हे बाकीचे स्टार हा टास्क पूर्ण करण्याचं चॅलेंज स्वीकारून पूर्ण करतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे .

‘पॅडमॅन’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. स्वस्त दरात सॅनिटरी पॅड तयार करणारे कोईंबतूरचे अरुणाचलम मुरुगननाथम यांच्या जीवनाशी प्रेरित आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी सॅनिटरी पॅड बनवणाऱ्या युगपुरुषाच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसणार आहे.

padman 1

ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करुन देणं, हे अरुणाचलम यांचं उद्दिष्ट होतं. मासिक पाळीत अरुणाचलम यांच्या गावातील तसंच समाजातील महिला चिंध्यांसारख्या अनारोग्यदायी वस्तू वापरत असत. बाजारातील सॅनिटरी नॅपकिन महागडे असल्यामुळे अरुणाचलम यांनी आरोग्यदायी पर्याय म्हणून स्वस्त सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन दिले.

अक्षय आणि सोनम एकत्र काम करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी दोघांनी 2011मध्ये ‘थँक्यू’ या सिनेमात काम केलं होतं. तर राधिका आपटे पहिल्यांदाच अक्षय कुमारसोबत कारण करणार आहे.