विकासाचं मॉडेल ठरत असलेलं परतूर तालुक्यातील अंबा गाव 

aamba

परतूर/ सोपान रोडगे – परतूर तालुक्यातील अंबा नावाच्या गावाने केलेली प्रगती सध्या मराठवाड्यात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.रस्ते ,पाणी,आरोग्य या सुविधांची वानवा असलेलं हे गाव फक्त दोन वर्षात विकासपथावर अतिशय वेगाने वाटचाल करत आहे.विकासाची दूरदृष्टी असलेलं नेतृत्व   आणि ग्रामस्थांच्या सहभागातून गावाने आता कात टाकली असून इतर गावांसाठी आता हे गाव विकासाचं मॉडेल म्हणून समोर येत आहे .चला तर मग जाणून घेऊया कसा झालाय आंबा गावचा कायापालट .

Loading...

परतूर तालुक्यातील अंबा गावात नवोदय विद्यालय असल्याने गाव तसं सर्वांच्या परिचयाचे आहे. परंतु या गावाचा हवा तसा विकास झालेला नव्हताच शिवाय गावात रस्ते ही नव्हते, गावातील सांडपाण्याची व्यवस्था सुद्धा केलेली नव्हती या गावाची ओळख फक्त नवोदय विद्यालयामुळेच होती.गाव ओसाड पडतंय कि काय अशी अवस्था गावची होती . याच गावातील प्रशांत बोनगे आणि त्यांच्या पत्नीला गावची हि दयनीय अवस्था अस्वस्थ करत होती करता येण्यासारखं खूप काही होत मात्र घडत काहीचं नव्हतं .गावची निवडणूक लागली आणि विकासाच्या मुद्द्यावर जनतेने विश्वास दाखवला आणि सौ. बोनगे सरपंच देखील झाल्या .

गेल्या दोन वर्षात सौ बोनगे यांच्या नेतृत्वाखाली गावाचा कायापालट झाला आहे, महाराष्ट्र देशाने प्रत्यक्ष गावात जाऊन जेव्हा गावातील विकास कामांची पाहणी केली तेव्हा गावातील ग्रामपंचायत पाहूनच गावाचा विकास दिसायला सुरुवात झाली ही ग्रामपंचायत एखाद्या आयुक्त कार्यालयासारखी सुसज्ज

अंबा

 आहे ग्रामपंचायत कार्यालयात डिजिटल कॉन्फरन्स हॉल, प्रोजेक्टर – ज्यामुळे ग्रामसभा घेताना गावातील लोकांना विविध स्कीमचे महत्व पटवून दिले जाते , सरपंच कार्यालय, स्वच्छतागृह, महापुरुषांचे अर्धाकृती पुतळे प्रवेशद्वारावर आहेत शिवाय ग्रामपंचायतीचा सर्व परिसर सी.सी.टी. व्ही कॅमेऱ्याच्या निगराणी खाली आहे, गावात लोकांना मोफत स्वच्छ पाणी मिळावे म्हणून गावातच वॉटर प्युरीफायर बसवले आहे, गावात सिमेंट काँक्रेटचे पक्के रस्ते बनवले आहेत, आणि या रस्त्यालगत दोन्ही बाजूंनी शोभेची झाडे सुद्धा लावलेली आहेत, गावात भूमिगत पाण्याची पाईपलाईन टाकून प्रत्येक घरात पाणी पोहचेल आशी व्यवस्था केलेली आहे, गावाच्या बाहेर निघताना रस्त्याच्या दोन्ही बाजूने सुमारे एक किमी पर्यंत कंपाउंड केलेले तर रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षारोपण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे आणि पिण्याच्या पाण्याची टाकी, असा आहे गावातील विकास नक्कीच प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी अस काही काम येथील सरपंचांनी केलं आहे. 

गावाचा विकास व्हावा असा ध्यास सतत प्रशांत यांच्या मनात होता म्हणून त्यांनी सरपंच पदावर आल्यापासून गावाच्या विकासासाठी अतोनात कष्ट घेतले आहेत आणि घेत ही आहेत शिवाय तालुक्याचे आमदार तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्यामुळे गावातील विकासाला चालना व दिशा मिळाली 

डॉ. कल्याण बोनगे (प्रशांत बोनगे यांचे चुलते )

तीन वर्षांपासून बाहेर गावी शिकायला असणाऱ्या मुलांना जेव्हा गावी येतात तेव्हा त्यांना स्वतःच्या गावात आलोय असे वाटत नाही इतके आमचे गाव बदलले आहे. 
-अर्जुन पितळे ( आंबा गावचे नागरिक )Loading…


Loading…

Loading...