नव्या प्रभाग रचनेवरून आम आदमी पक्षाची प्रस्थापित पक्षांवर जहरी टीका

आप

पुणे – ठाकरे सरकारनं महानगरपालिकांसाठी मोठा निर्णय घेतलाय. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असेल.

दरम्यान, या निर्णयावर आम आदमी पक्षाने टीकास्त्र सोडले आहे. तीन नगरसेवक प्रभाग पद्धत ही संविधानाने सर्वसामान्यांना मिळालेले प्रतिनिधित्वाचे अधिकार अप्रत्यक्षपणे काढून घेणे आहे. या मुळे छोटे पक्ष व व्यक्ती या निवडणुकीमधून बाहेर फेकले जातात व हा सर्व प्रस्थापित पक्षांचा कट आहे अशी प्रतिक्रिया आप चे राज्य संयोजक रंगा राचुरे यांनी दिली आहे.

रंगा राचुरे म्हणाले, हा निर्णय तर्कसंगत वाटत नाही व राजकीय हितसंबंध जपण्यासाठी घेतलेला व व्यवहारात पूर्वी भाजप ने केलेल्या ४ च्या प्रभागा प्रमाणेच स्थानिक नागरिकांना ‘आपला कुणीच वाली नाही’ ही भावना निर्माण करणारा ठरू शकतो. महाविकास आघाडीने या पूर्वी एक वॉर्डाचा निर्णय का घेतला? मुंबईला वेगळा निकष का? यामुळे राजकीय हितसंबंधातून हे निर्णय घेतले जाणे लोकशाही व्यवस्थेसाठी निश्चितच चांगले नाही.

या प्रकारच्या प्रभाग पद्धतीने-छोट्या पक्षांच्या,अपक्ष, सामान्य उमेदवारांना भौगोलिक आवाक्यामुळे या निवडणुका लढवणे अवघड जाते, साधने जास्त खर्ची पडत असल्यामुळे निवडणुका फक्त पैश्यावाल्या लोकांकडूनच लढल्या जातात एका प्रभागात अनेक नगरसेवक झाल्याने प्रभागातील कामांना, अडचणींना जबाबदार नगरसेवक कोण याबद्दल साशंकता निर्माण होते. प्रभागातील कामांना नगरसेवकांचा परस्पर विरोध सुरू होतो आणि कामे रेंगाळतात. निवडून येणारा नगरसेवक स्थानिक नसल्याने तेथील स्थानिक समस्यांबाबत अनभिज्ञ राहतो. ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्थानिक न राहता विधानसभा पातळीची बनून जाते असं देखील ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या