fbpx

‘आप’ला खिंडार; नऊ आमदार कॉंग्रेसच्या संपर्कात

नवी दिल्ली : असं म्हटलं जातं कि राजकारणात कोणीही कायमचं शत्रू नसतं त्यामुळेच एकमेकांवर सडकून टीका करणारे विरोधक कधी एक होतील याचा नेम नाही. दिल्लीतील सत्ताधारी आपचे नऊ आमदार संपर्कात असल्याचा दावा काँग्रेस प्रवक्ते जितेंद्र कोचर यांनी केला आहे. या नऊ आमदारांनी काँग्रेस प्रवेशाची इच्छा व्यक्त केल्याचेही कोचर यांनी सांगितले.

आपने निलंबित केलेले माजी मंत्री संदीप कुमार यांनी दिल्ली काँग्रेस समितीच्या कार्यालयाला भेट दिली. कोचर यांनी संदीप कुमार यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दिक्षित यांची भेट घेतल्यानंतरच हे वक्तव्य केले आहे.

दरम्यान, आम आदमी पार्टीला सोबत घ्यायला कॉंग्रेसने नकार देताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना संताप अनावर झाला आहे. काँग्रेसने भाजपसोबत छुपी आघाडी केल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.