आम आदमी पार्टीचे उद्या राज्यभरात ‘वीजबिल माफ करा’आंदोलन

AAP

पुणे : कोविड-19 च्या संकटामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थती बिकट बनली आहे. या परिस्थती मध्ये त्यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे बनलेले आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 20 लाख कोटीच्या पॅकेजचा सामान्य माणसाला किती उपयोग होईल याबद्दल विविध मतमतांतरे आहेत. यापार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आता त्वरित राज्यातील नागरिकांचा आर्थिक ताण हलका करण्याच्या दृष्टीने पावले उचलून त्यांना दिलासा देणे गरजेचे बनले आहे.

यासाठीच आम आदमी पार्टी महाराष्ट्राच्या वतीने राज्यातील वीज ग्राहकांची लॉकडाऊन काळातील 200 युनिट पर्यंतची वीजबिले माफ करावीत ही मागणी घेऊन उद्या दि. 3 जून रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाद्वारे राज्यभरात जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर करून राज्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारकडे ही मागणी पोहचवण्यात येणार आहे.

राज्यभरातील वीज ग्राहकांच्या भावना अधोरेखित करणारे व्हिडीओ प्रकाशित करून ते सोशल मीडियावरद्वारे सरकारपर्यंत पोहचवण्यात येणार आहेत. या आंदोलनात आम आदमी पक्षाचे सर्व पदाधिकारी सामील होणार असून, गाव व शहर पातळीवरील सर्व वीज ग्राहक नागरिकांना वीज माफी आंदोलनात सामील करून घेतले जाणार आहे. सोशल मिडियाद्वारे व्हिडीओ प्रकाशित करून #वीजबिलमाफकरा हा हॅशटॅग सर्वत्र चालवला जाणार आहे.

एका बाजूला दिल्ली येथील अरविंद केजरीवाल सरकार मागील दोन वर्षांपासून 200 युनिट पर्यंत वीज मोफत देत आहे.सामान्य नागरिकांच्या लोकडाऊन काळातील विजेची बिलं माफ झाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळणार असल्यामुळे ‘आप’च्या वतीने ही मागणी लावून धरण्यात येणार आहे.

आपल्या सुमधुर गायनाने सोशल मिडीयावर धुमाकूळ घालणारे हे दोघे आहेत तरी कोण ?

निवडणुकीच्या वेळेस मजुरांना गावी आणण्याची सोय करता, मग आता का त्यांना नको म्हणता : सदाभाऊ खोत

बॅंका राज्य सरकारचे ऐकून शेतकऱ्यांना खरिपासाठी कर्ज देतील का?