हा नवा लॉकडाउन म्हणजे सरकारच्या अपयशाची जनतेला शिक्षा !

Uddhav-thackeray_20190921

पुणे-पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा १० दिवसांचा लॉकडाऊन अजित पवार यांनी जाहीर केला आहे. राज्य सरकार अनलॉक मिशन सुरु झाल्याचे सांगत असताना पुण्यात पुन्हा लॉक डाऊनने सामान्य माणसाच्या तोंडचे पाणी पळाले आहेच पण आता मध्यमवर्गीय माणसालाही घाम फुटला आहे. खरेतर लॉकडाऊनमुळे संसर्गाचा वेग कमी होतो आणि त्या काळात या आपत्तीला तोंड देण्यासाठी सुसज्ज व्यवस्था करणे हा यामागचा उद्देश होता. या १०० पेक्षा जास्त दिवसांच्या काळात मुख्यत्वे आरोग्य सुविधाचे मोठ्या प्रमाणावर सक्षमीकरण अपेक्षित होते. परंतु आजही पुणे शहरात खाजगी व सरकारी इस्पितळात केवळ ३ आयसीयु बेड उपलब्ध असल्याचे तर ५ व्हेन्तिलेटर आयसीयु बेड असल्याच दिसते आहे.

आम आदमी पक्षाचे नेते मुकुंद किर्दत यांनी याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे. ३५ लाख पेक्षा अधिक जन्संख्येस या सुविधा कश्या पुरणार? मुख्यमंत्र्यांनी विप्रोच्या सहकार्याने हिंजवडीत हॉस्पिटलची घोषणा केली परंतु महिनाभरानंतरही अजून हॉस्पिटल सुरु झालेले नाही. पुण्यात अम्बुलांस वेळेत न मिळाल्याने मृत्यू होत आहेत. तर कोविद पेशंटला दवाखाना शोधत फिरावे लागत आहे. आज दिल्लीत तपासणी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. पुण्यात मात्र सध्या केवळ ४००० टेस्ट होत आहेत. ही टेस्टची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवायची गरज आहे. रोज सरासरी २० मृत्यू होत आहेत. अलगीकरण कक्षांची स्थिती पाहून रुग्ण पळून जात आहेत. कोरोना व्यतिरिक्त इतर रुग्णांना सेवा मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. या कोविद विषाणूचा संसर्ग वाढतच जाणार आहे परंतु पुण्यात सरकारला आरोग्य सेवा पुरवण्यात अपयश येत असल्याने ह्याचा दोष जनतेच्या माथी मारून जनताच लॉकडाऊन पाळत नसल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. सरकारचे अपयश लपवण्यासाठीच हे सर्व केले जात असल्याचं म्हटलं आहे.

किर्दत म्हणाले, पुण्यात ८ आमदार,भाजपा चे खासदार, महापौर, राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले पालकमंत्री आणि विभागीय आयुक्त , जिल्हाधिकार्यांच्या सोबतीला ४ आयएएस अधिकारी काय करत आहेत असा प्रश्न जनतेस पडला आहे. पुण्यातल्या या अपयशाला प्रशासनासोबतच स्थानिक पालिकेतील भाजपा , राज्यातील महाआघाडी आणि केंद्रातील भाजपा सरकारे जबाबदार आहे. परंतु या आपत्तीकाळातही ही सामुहिक जबाबदारी न स्वीकारता भाजपा नेते आणि कोन्ग्रेस- राष्ट्रवादी नेते जनतेचा आवाज उठवण्याऐवजी एकमेकांना राजकीय चिमटे काढण्यात मश्गुल आहेत.

किर्दत म्हणाले,या लॉकडाऊन मुळे ज्यांना गेले ३ महिने रोजगार नाही, त्यांना आता घर चालवणे अशक्य झाले आहे. तुटपुंज्या रेशनवर घर चालत नाही . वीजबिल अवाच्या सवा आले आहे. ते भरण्यासाठी , मुलांची शाळेची फी भरण्यासाठी लोकांकडे पैसे नाहीत . ही स्थिती फक्त गरिबांची नव्हे तर मध्यम वर्गीयांची आहे. पुण्यात गेल्या जून महिन्यात २० जणांनी आत्महत्या केली आहे. त्यामागे मुख्यत्वे आर्थिक संकट कारणीभूत आहे . छोटे व्यापारी , खानावळवाले , घरकामगार महिला, बांधकाम मजूर , रोजंदारीवरील कामगार ,रिक्षा चालक , वाहतूकदार, लघु उद्योजक या सगळ्यांपुढे मोठे आर्थिक अरिष्ट उभे आहे. यासाठी मुख्यत्वे असंघटीत कामगारांना किमान ५००० रुपये महिना मदत देणे गरेजेचे आहे. दिल्लीत आप सरकारने बांधकाम मजूर, सार्वजनिक वाहतूकदार, जेष्ठ नागरिक , विधवा , दिव्यांग यांना ५००० रोख मदत दिली आहे. २०० युनिट वीजबिल माफ आहे या पद्धतीचे कोणतेही प्याकेज न देता जनतेला घरी बसायला सांगणे अयोग्य आहे.

याच वेळेस गेल्या महिन्याभरात थोड्याफार प्रमाणात औद्योगिक साखळी सुरु होत असताना पुन्हा लॉकडाऊन जाहीर केल्याने मोठा फटका उद्योगांना बसणार आहे. महाराष्ट्र सरकारचे ‘महा जॉब्स‘पोर्टल आणि केंद्र सरकारचे ३ लख कोटी चे लघु उद्योगांना कर्ज प्याकेज यांनी उद्योगांना आणि कामगारानाही कोणताही दिलासा मिळत नाही हे कळत असूनही त्याचाच गवगवा करत सरकार लॉकडाऊन चा अजब निर्णय घेते आहे अशी टीका त्यांनी केली.
सरकार आरोग्यसेवा सुधारत नाही , जनतेस प्रत्यक्ष आर्थिक दिलासा देत नाही , उद्योगांना – अर्थव्यवस्थेस चालना देत नाही आणि लॉक डाऊन करण्याचे निर्णय घेते आहे . ह्यामुळे आज आम आदमी पार्टीने पुन्हा एकदा जनतेला प्रत्यक्ष आर्थिक दिलासा प्याकेज , वीज बिल माफी , शाळा फी सवलत , तातडीने आरोग्य व्यवस्थे चे सबलीकरण , दवाखाना बिलाबाबत ओनलाईन २४ तास चालणारी तक्रार निवारण सेवा याची जाहीर मागणी केली आहे. तसे सविस्तर निवेदन मुख्यमंत्री कार्यालयास पाठवत आहे असं त्यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

धारावीतील कोरोना नियंत्रण हे केवळ RSS आणि अन्य संस्थांमुळे, नितेश राणेंचा दावा

‘राजकीय हितासाठी कॉपी बहाद्दर सरकारचा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ,विद्यार्थ्यांच्या आरोग्य काळजीचे दावे खोटे’

लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून पुण्यात कलगीतुरा, बापटांनी अजित पवारांवर केली शेलक्या शब्दात टीका

पक्ष, राजकारण यापलिकडे जाऊन मनसेच्या ढाण्या वाघाने घेतली इंदोरीकर महाराजांची भेट