महाराष्ट्रात ‘या’ जागेवर आपचा कॉंग्रेसला पाठींबा

टीम महाराष्ट्र देशा : आप येणारी लोकसभा लढवणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या विरोधातील मतदान विभागले जाऊ नये म्हणून आम आदमी पक्षाच्या राज्य कार्यकारीणी आणि केंद्रीय शिखर कार्यकारिणी ने पूर्ण विचाराअंती पक्ष निवडणूक लढवणार नाही असा निर्णय घेतला आहे. जो भाजप आणि सेनेला हरवू शकतो त्याला पाठिंबा दयावा ही भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीने पुण्यात उमेदवार न देता भाजपा हटाव- लोकशाही बचाव’ या निकषावर भाजपा विरोधातील सक्षम उमेदवार म्हणून कॉंग्रेसचे मोहन जोशी यांना शहर पातळीवर पाठींबा जाहीर केला आहे.

2014 मध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले होते. विरोध सहनच करायचा नाही असे ठरवून हिटलरवादाकडे भाजप झपाट्याने जाऊ लागला संघ परिवाराने द्वेष हे विस्ताराचा हत्यार बनविले, गाई बैलाच राजकारण करून लोकांना फासावर लटकवले. समाज फोडून सत्ता गाजविण्याचा पूर्ण प्रयास केला. राज्यकारभार चालवण्याच्या सर्व संस्था उद्ध्वस्त केल्या. नियोजन आयोगाला नष्ट करून रिझर्व बँक ऑफ इंडिया,सीबीआय, न्यायालये आणि सैन्यदले आपल्या ताब्यात घेण्याचा पूर्ण प्रयत्न चालू आहे. असा आरोप आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.

Loading...

तसेच , भाजपा निर्लज्जपणे सैन्यदले सुद्धा राजकारणासाठी वापरू लागले. पुलवामानंतर सैन्याचा उपयोग पूर्णपणे निवडणूक जिंकण्यासाठी भाजप करू लागली. येदुरप्पा,योगी आदित्यनाथ आणि अमित शहा पोकळ राष्ट्रवाद दाखविण्यासाठी जणू काय बालाकोट हवाई हल्ला स्वतःच केला, असा आव आणू लागले. भारतीय सैन्याला आदित्यनाथ मोदी सेना म्हणू लागले. त्यातच आरएसएसचे संघ सेवक तीन दिवसात युद्धाला तयार होऊ शकतात असे भागवत म्हणाले. सैनिकांचा प्रचंड अपमान केला. जसे हिटलरने त्याच्या पक्षाचे सैन्य(SS) बनवले होते तसेच संघ परिवाराचे सैन्य बनविण्याची प्रवृत्ती संघ परिवार दाखवत आहे. हिटलरच्या SS ने जर्मन अधिकारी आणि सैनिकांच्या हत्या केली त्याचप्रमाणे संघ परिवाराची चाल दिसत आहे. म्हणून राष्ट्राच्या सुरक्षेसाठी भारतीय जनता पार्टीचे सरकार उखडून फेकणे हे राष्ट्रप्रेमी लोकांच प्रथम कर्तव्य आहे. ते करण्यासाठी व भाजप विरुद्ध मतदान विभागले जाऊ नये म्हणून आम आदमी पक्ष आपले हित न बघता देशाचे हित प्रथम ठेवून निवडणूक लढवत नाही. त्याच बरोबर जो भाजपला हरवू शकतो त्यांना मदत आप पक्ष करेल.

दरम्यान, कॉंग्रेस उमेदवार मोहन जोशी यांनी आप पुणे शहर अध्यक्ष मुकुंद किर्दत यांचेकडे पाठींबा मागणी पत्र दिले होते. या संदर्भात राज्य समितीशी सल्लामसलतीनंतर पाठींब्याचा निर्णय घेण्यात आला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'