कार्तिकीच्या निमित्ताने आळंदीत लाखोची गर्दी

पुणे – दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा आळंदी इथे कार्तिक यात्रेसाठी सुमारे साडेतीन लाख भाविक जमले आहेत. कार्तिक वद्य एकादशीच्या निमित्तानं ज्ञानेश्वर माऊलींच्या अलंकापूरीत वारकर्यांनी गर्दी केली असून इंद्रायणीचा काठ हरिनामाच्या गजरानं दुमदुमून गेला आहे.

Rohan Deshmukh

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७०० व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपूराहून संत नामदेव महाराजांची पालखी आळंदीत दाखल झाली आहे. पालखी सोहळ्याला लष्करी शिस्त देणार्याग हैबतबाबांच्या पायरीची पूजा करुन शनिवारपासून सुरु झालेला संजीवन समाथी सोहळा आता रंगात आलेला आहे. आज पहाटे संजीवन समाधीवर एकादशीनिमित्त पवमान अभिषेक झाला. दुपारी महानैवेद्यानंतर माऊलींची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल. उद्या मंगवारी माऊलींचा रथोत्सव होणार आहे.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...