‘आलं रे आलं’ आईपीएलचं वेळापत्रक आलं

ipl

दुबई: क्रिकेटप्रेमींसाठी आताची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. बहुप्रतिक्षीत क्रिकेट स्पर्धा आयपीएलचं वेळापत्रक आलेलं आहे. 19 सप्टेंबरपासून या क्रिकेट हंगामाला सुरुवात होणार आहे आणि यावर्षीही पहिली लढत मुंबई विरुद्ध चेन्नई मध्ये होणार आहे. वृत्तसंस्था ANI ने यासंदर्भात ट्विटद्वारे माहिती दिली आहे.

कपूर घराण्यात कोरोनाचा शिरकाव!

सुरुवातीला आईपीएल होईल की नाही याबद्दल शंका उपस्थित करण्यात येत होती कारण कोरोनामुळे परिस्थिती बिघडत चालली होती. सामने सुरू असताना प्रेक्षकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून विनाप्रेक्षक सामने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता आयपीएलचे सर्व संघ सुद्धा दुबईत दाखल झाले होते. यावर्षी आयपीएल भारतात होत नसून UAE त होत आहे. आता या सामन्यांना बघण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

अहो कसला फोन,उलट दाऊद म्हणत असेल हाच मुख्यमंत्री पाहिजे