नेशन फर्स्ट नाही, आता त्यांच्या साठी इलेक्शन फर्स्ट-आदित्य ठाकरे

aaditya thakray

टीम महाराष्ट्र देशा- नेशन फर्स्ट नाही, आता त्यांच्या साठी इलेक्शन फर्स्टझालं असून गुजरात निवडणुकीमध्ये या व्यापाऱ्यांच्या नाराजीचा आपल्याला फटका बसेल असा अंदाज आल्याने केंद्रातील भाजप सरकारने जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला अशी टीका युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी केली आहे.

व्यापारी आणि जनतेच्या संतापानंतर केंद्र सरकारने जीएसटीच्या जाळ्यातून काहीसा दिलासा दिला होता. २०० वस्तूंवरील जीएसटी कराचा बोजा कमी करत केंद्र सरकारने एसी आणि नॉन एसी हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये आता सरसकट ५ टक्के जीएसटी आकारणार असल्याचं जाहीर केलं होतं. १० नोव्हेंबरला घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी १७८ वस्तूंवर २८ ऐवजी १८ टक्के कर लावला जाईल असं जाहीर केलं होतं.मात्र हे सगळं गुजरात निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलं असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात असतो.हाच मुद्दा पकडून आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाना साधला आहे .