स्वबळावर लढायचं आणि स्वबळावर जिंकायचं, आदित्य ठाकरेंची गर्जना

टीम महाराष्ट्र देशा- स्वबळावर लढायचे आहे ते स्वबळावरच एकहाती सत्ता आणायची ती महाराष्ट्रातच, अशी गर्जना आज युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिली. पुन्हा एकदा स्वबळ आजमवण्याचा नारा त्यांनी पुन्हा एकदा दिला. तन आणि मन लावून शिवसैनिक लढत असतात. आपल्याला फक्त मतं नाही तर मनंही जिंकायची आहेत. महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणायचीच ही शपथ मी या मंचावरून घेतो आहे असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

शिवसेनेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील गोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करतान आदित्य ठाकरे यांनी स्वबळाच्या नाऱ्याचा पुनरुच्चार करताना शिवसेनेचा राज्याबरोबरच देशपातळीवर विस्तार करण्याचे लक्ष्य समोर ठेवले.

You might also like
Comments
Loading...