वन खात्याचं नाव बदलून शिकारी खातं करा,आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई – वनविभागाच्या शोध पथकाला गुंगारा देणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आलं. तिनं आतापर्यंत 13 जणांचा जीव घेतला होता. मात्र टी-1 वाघिणीच्या मृत्यूनंतर वन्यजीव प्रेमींनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘वन खात्याचं नाव बदलून शिकारी खातं असे करायला हवे’ अशी टीका टी-1 वाघिणीला ठार मारल्याप्रकरणी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरवरून वन मंत्रालयावर केली आहे.

वाघिणीला मारण्याची न्यायालयाकडून परवानगी होती का? तिला बेशुद्ध करून पकडता आलं नसतं का? एक वन्यजीवप्रेमी म्हणून आपल्याला पडलेले हे प्रश्न आहेत. मात्र आज अवनीला ठार केलं. उद्या तिच्या बछड्यांचा किंवा आणखी दुसऱ्या वाघाचा बळी घेतला जाईल, असा असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?
13 जणांचा जीव घेणाऱ्या टी-1 वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या 47 दिवसांपासून वनविभागाचे प्रयत्न सुरू होते. अखेर शुक्रवारी रात्री वन विभागाच्या रेस्क्यू टीमनं तिला ठार केलं. वाघिणीला आधी बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तिने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने तिला गोळी घालण्यात आली.

You might also like
Comments
Loading...