देशभरात प्लास्टिक बंदीसाठी कायद्याची युवासेना नेते आदित्य ठाकरे यांची मागणी

आदित्य ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा- देशभरात प्लास्टिक बंदीसाठी कायदा करावा, अशी मागणी युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधानांनी प्लास्टिकमुक्तीचं आवाहन केलं होतं, त्याबद्दल ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानत, प्लास्टिकचं उत्पादन, विक्री आणि वापरावर बंदी आणण्याची मागणी केली.

महाराष्ट्रासह वीस राज्यांनी प्लास्टिक बंदी लागू केली आहे, याकडेही आदित्य यांनी लक्ष वेधलं. एकदाच वापरण्यायोग्य प्लास्टिकवर बंदीमुळे, कापडी पिशव्यांसारख्या पर्यायी वस्तू बनवणाऱ्या महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

Loading...

दरम्यान, राज्यात २३ जूनपासून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरु आहे. दुकानदार, फेरीवाले, मॉल्स, हॉटेल, हॉस्पिटल या सर्व आस्थापनांकडे बंदी असलेले प्लास्टिक आढळले तर त्यांना पाच ते वीस हजारांपर्यंतचा दंड होऊ शकतो. तर दुसऱ्या बाजूला राज्य सरकारच्या या निर्णयामुळे काही व्यापाऱ्यांमध्ये काहीअंशी नाराजीचे वातावरण आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...