मुंबई : मागील दोन-तीन दिवसांपासून शिवसेना आगामी मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीत ५० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नगरसेवक किंवा नेत्यांना तिकीट देणार नसल्याच्या बातम्या बघायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’विशिष्ट वयोगटाला निवडणुकीचे तिकीट देण्याबाबत गेले २-३ दिवस मी काही बातम्या बघत आहे. या बातम्या खोट्या आहेत. शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळतं’, असे आदित्य ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
विशिष्ट वयोगटाला निवडणुकीचे तिकीट देण्याबाबत गेले २-३ दिवस मी काही बातम्या बघत आहे. या बातम्या खोट्या आहेत. शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळतं.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 9, 2022
दरम्यान, मुंबईमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. याला अनुसरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सामने रंगायलाही सुरुवात झाली आहे. असे असतांनाच मुख्यमंत्री ठाकरेंनी जिल्हा विकास योजनेतील निधीतून केलेली कामे मार्गी लावा, त्यांचा अहवाल तयार करा आणि शहरात शिवसेनेने केलेली कामे आणि निर्णय लोकांपर्यंत पोहोचवा, असा आदेश विभागप्रमुखांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘…तर घटनात्मक तरतुदींनुसार करायच्या इतर अनेक गोष्टी का डावलल्या जातात?’
- कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकालानंतर जल्लोष करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
- ‘विरोधकांनी नियमावली पाळायची आणि सत्ताधाऱ्यांनी ती धुडकावली तरी…’, राऊतांचा हल्लाबोल
- “…त्यामुळे निवडणूक आयोगाच्या ‘सभाबंदी’च्या धोरणामुळे भाजपला आनंदच झाला असेल”
- ‘…या काळात देशात दररोज ४ ते ८ लाख रुग्णसंख्या आढळू शकते’, आयआयटी प्राध्यापकाचा दावा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<